डॉक्टरांनी किती फी घ्यावी, हे कसे ठरते?

तुम्ही पाहिले असेल की, डॉक्टरांच्या खोलीत ‘‘पहिल्या तपासणीची फी 50 रुपये’’, ‘‘पुनर्तपासणी 25 रुपये’’ अशा पाट्या लावलेल्या असतात. वेगवेगळ्या शहरात ही फी वेगवेगळी असते. वेगवेगळ्या उपचार पद्धतींच्या बाबतीतही ही फी वेगवेगळी असते. वैद्यकीय सेवा ही अत्यंत कौशल्यपूर्ण अशी तांत्रिक सेवा आहे. डॉक्टरांनी किती फी घ्यावी, याबाबत कोणताही कायदा नाही.

एखादा डॉक्टर 50 घेईल, तर दुसरा 500 घेईल. स्वतःची फी ठरवण्याचा डॉक्टरला कायद्याने अधिकार आहे. डॉक्टरचे स्वतः विषयीचे मूल्यमापन, त्याचा त्या क्षेत्रातील अनुभव, त्याच्या पदव्या, त्याला मिळालेली प्रसिद्धी, त्याच्याकडे असलेली आधुनिक उपकरणे व रुग्णांची आर्थिक परिस्थिती या सर्वांच्या आधारे डॉक्टरांची फी आपोआप ठरत असते. बर्‍याच ठिकाणी वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या (जसे बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ) संघटना अस्तित्वात असतात. त्या डॉक्टर व रुग्ण या दोहोंचे हीत लक्षात घेऊन तपासणी शुल्क ठरवतात. यात रुग्णाला फीबाबत माहिती व्हावी, गैरसमज होऊ नये, तसेच डॉक्टरांचेही नुकसान होऊ नये; हा हेतू असतो.

बर्‍याचदा डॉक्टर इतरांपेक्षा कमी फी घेऊन अनैतिक स्पर्धा चालू करतात. त्यालाही यामुळे आळा बसू शकतो. गरज, पुरवठा व बाजारातील परिस्थिती यांवर जसे सर्व वस्तूंचे भाव ठरतात; त्यानुसारच डॉक्टरांची फीही ठरते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा