गीताभवन

गीताभवन  – ही वास्तू शहरातच आहे. सिंधमधून फाळणीच्या वेळी भारतात आलेल्या एका सिंधी गृहस्थाने ही वास्तू उभारली आहे. हे मंदिर भव्य आणि सुंदर आहे.

प्रवेशद्वार दक्षिणेतील गोपुराच्या पद्धतीचे आहे. अनेक देवतांच्या  सुंदर मूर्तीची मंदिरे आहेत. सभागृहात इतिहासकालीन दृश्यांची तैलचित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वार चार पूर्णाकृती दगडांवर उभारलेले आहेत.