गांजा म्हणजे काय?

कॅनावीस सॅटीव्हा नावाच्या झाडापासून मादक पदार्थ मिळतात. भारतात भांग, मजनु, गांजा व चरस अशा अनेक पदार्थांच्या रूपात त्याचा वापर केला जातो. ह्या झाडाचे सर्वच भाग विषारी असतात. कॅनाबिनॉल नावाच्या विषारी घटकामुळेच याचे दुष्परिणाम दिसून येतात. या वनस्पतीच्या स्त्रीलिंगी झाडाच्या वाळलेल्या मोहोरापासून गांजा मिळवतात. ही झाडे विशिष्ट प्रकारे वाढवण्यात आल्याने त्यात पान अगदी लहान, पण कॅनॉबिनॉल हा पदार्थ जास्त प्रमाणात असतो.

गांजामध्ये 25% इतके कॅनॉबिनॉल असते. तंबाखू व गांजा यांचे मिश्रण चिलीमीमध्ये भरून लोकं धूम्रपान करतात. कॅनाबिनॉलच्या परिणामामुळे व्यक्ती स्वतः वर खूष असते, बडबड करते, तिची भूकही वाढते. मेंदूच्या सारासार विचार करणार्‍या केंद्रांवर परिणाम होऊन ती व्यक्ती स्थळ, काळ, वेळ यांचे तारतम्य विसरते. व्यक्तीला लैंगिक भ्रम होतात. काही व्यक्ती त्यांच्या वाटेस कोणी गेले, तर हिंसक होऊ शकतात. खूप गांजा शरीरात गेल्यास व्यक्तीला गाढ झोप येते व क्वचित कोमात जाऊन मृत्यूही येऊ शकतो. दर किलो वजनामागे 8 ग्रॅम या प्रमाणात वा जास्त गांजा खाल्ल्यास मृत्यू येऊ शकतो. व्यक्ती 12 तासांतही मरू शकते. यावर उपाय म्हणजे पोटातील विष बाहेर काढावे. याखेरीज कडक चहा पाजणे, कृत्रिम श्‍वसन इत्यादीचाही वापर केला जातो.

गांजाचे व्यसन अनेक जणांमध्ये आढळून येते. या व्यसनाने मनुष्य निष्क्रीय बनतो. काम करत नाही. शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात व प्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे अशा व्यसनांपासून दूर राहणेच श्रेयस्कर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा