गणेश विसर्जनादरम्यान जिल्ह्यात एक जण बेपत्ता, एकाचा बुडून मृत्यू

अहमदनगर- गणेश विसर्जनासाठी गेलेला एकजण पाण्यात वाहुन बेपत्ता झाला असून एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.12) श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे प्रवरा नदीपात्रात व शेवगाव येथील ढोरा नदीपात्रात घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरापूर तालुक्यातील उक्कलगाव येथे इयत्ता 12 वीत शिकणारा सौरभ विठ्ठल कर्डिले (वय 18) हा गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात उतरला होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सौरभ याचा पाय घसरुन तो पाण्यात वाहून गेला. त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी आरडाओरडा केला असता स्थानिक युवकांनी नदीत उडी मारुन त्याला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधण्याचे काम सुरु होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक राहुल मदने व पोलिस निरीक्षक श्रीहरी भैरट यांनी घटनास्थळी भेट दिली.

दुसरी घटना शेवगाव येथील ढोरा नदीपात्रात घडली. अनिल विलास वाल्हेकर (वय 20, रा.शेवगाव) हा घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी ढोरा नदीपात्रात गेला असता त्यावेळी पाय घसरुन पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा