नोकरीचे आमिष दाखवून 17 लाखांची फसवणूक

अहमदनगर- शिक्षिका या पदावर नियुक्ती करतो असे सांगुन विश्‍वास संपादन करून 17 लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सैनिक नगर, आलमगीर रोड, विजयनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाण येथे 31 जुलै 2013 ते 2016 या दरम्यान घडली.

भिंगार परिसरातील सैनिक नगर येथे सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे (सर्व रा. आलमगीर, भिंगार), सचिव अनिल तुळशिराम शिंदे, उपाध्यक्ष मंगला अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपुर) व सदस्य राजु बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी.), संजय बन्सी साळवे, रेखा सुजय साळवे (दोघे रा. आलमगीर, भिंगार) यांनी रूषाली गणेश होळकर/रूषाली गणेश कुलट (वय 32, रा.खातगाव टाकळी, नगर) यांना शिक्षिका या पदावर नियुक्ती करतो, असे सांगुन मुलाखत घेऊन तात्पुरत्या स्वरूपाची ऑर्डर दिली व वेळेवर पगार मिळण्याची हमी दिली. त्यानंतर त्यांनी संगनमत करून रूषाली होळकर यांच्याकडुन काही रक्कम घेतली. घेतले व शासनाची ऑर्डर मिळवुन देवू असे सांगुन विश्‍वास संपादन केला. त्यानंतर सौ. होळकर यांना कोणत्याही प्रकारचे मानधन व पगार न देता त्यांची फसवणुक केली. सौ. होळकर यांनी पगाराची व दिलेल्या पैशांची एकुण रक्कम 17 लाख रूपयांची मागणी केली असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा दम दिला.

या प्रकरणी सौ. होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, 504, 506, 34 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बेंडकोळी हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा