फ्लावरची पचडी

साहित्य – 1 किलो फ्लावर, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, दीड वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, पाव वाटी लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर, फोडणीसाठी अर्धी वाटी तेल, मोहरी, हिंग, हळद, 3-4 वाळवलेल्या सांडगी मिरच्या.

कृती – फ्लावर किसून घ्यावा. तेलाची फोडणी करावी. त्यात सांडगी मिरच्या चुरडून घालाव्या. फ्लावरचा कीड, फोडणी आणि इतर गोष्टी एकत्र कराव्यात.