वाळूत घेतले कृषिउत्पादन !

वेगाने होत असलेले शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे शेतजमिनीची कमतरता भासू लागली आहे. त्यावर उपाय म्हणून दत्तीसगढच्या कृषी संशोधकांनी एक अनोखा प्रयोग केला आहे. त्यांनी मातीऐवजी वाळू, लाकडाचा आणि धान्याचा भुसा यांचा वापर करून त्यामध्ये टोमॅटो आणि काकडीचे बंपर पीक घेण्यात यश मिळवले. इतकेच नव्हे तर हायड्रोपोनिक्स सिस्टीमने लसून, स्ट्रॉबेरी आणि शेवंतीचेही उत्पादन घेतले. हवेतील शेती म्हणजेच एअरोपोनिक्स सिस्टीमच्यायशाबाबतही या कृषी संशोधकांना खात्री आहे.

नापिक आणि ओसाड जमिनीचाही अशी पद्धतींमुळे पिकोत्पादन धेण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. फुले-फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी सुपीक जमिनीची गरज आता भासणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील संशोधकांनी हे प्रयोग केले आहेत. त्यांनी हायड्रोपोनिक्स सिस्टीमने वाळू आणि भुशामध्ये पिके घेऊन दाखली. याटिकाणी फुलझाडे, कॉलिफ्लॉवर, कोथिंबीर आणि पालकचे उत्पादन घेण्याचेही प्रयोग करण्यात आले आहेत.

आधी लाकडाचा भुसा वापरण्यात आला होता. तो महाग ठरतो असे दिसल्यावर नारळाचा चौथा वापरण्यात आला. त्यांनंतर सहजपणे उपलब्ध असलेला धान्याचा भुसाही वापरण्यात आला. अशा ठिकाणी उगवलेले टोमॅटोचे रोप चांगले उंच असून ते वर्षातील दहा महिने फळ देते, असे त्यांनी म्हटले आहे.