इंजिनिअरींग अॅवार्डस् साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सतर्फे 

अहमदनगर- थोर अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 15 सप्टेंबरला अभियंता दिनाच्या दिवशी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या नगर केंद्रातर्फे जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या अभियंत्यांना प्रतिष्ठेचे अभियंता पुरस्कार देण्यात येतात.

अभियंता दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन पुरस्कार प्राप्त अभियंत्यांचा गौरव करण्यात येतो. 2020 हे वर्ष इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स या संस्थेचे शताब्दी वर्ष असून त्यानिमित्त संस्थेतर्फे अभियंत्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

अभियंता दिनानिमित्त संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांमध्ये आऊटस्टँडींग इंजिनिअर अवार्ड, इंजिनिअरींग अचिव्हमेंट अवार्ड, प्रॉमिसिंग इंजिनिअर अॅवार्ड व लेडी इंजिनिअर अॅवार्ड या पुरस्कारांचा समावेश असतो. तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळाकडून निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे ज्येष्ठ अभियंत्याला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षीच्या अभियंता पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील विविध औद्योगिक, शैक्षणिक, सरकारी व खासगी कार्यालयांकडून, तसेच इतर अभियंत्यांनी व्यक्तिगत स्वरूपात विहित नमुन्यामध्ये नामनिर्देशन करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अविनाश कुलकर्णी व मानद सचिव रामनाथ वायकर यांनी केले आहे.

पुरस्कारांसाठीचे नामांकन अर्ज व मार्गदर्शक प्रणाली संस्थेच्या इरिगेशन कम्पाऊंड, औरंगाबाद रोड येथील कार्यालयात उपलब्ध आहेत. नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट अशी आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 2323359 किंवा मो. क्र. 9921644998 व 9422305674 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा