हैद्राबादेत बलात्कार करून खून करणार्‍या ‘त्या’ चारही नराधमांचा पोलिसांनी केला एन्काऊंटरमध्ये खात्मा

पोलिस कारवाईचे देशभरातून स्वागत

हैदराबाद- हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले 4 आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजता घडली. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

तपासादरम्यान या 4 आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही थांबवण्यचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या. यात या चौघांचा मृत्यू झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी दिली.

मदतीच्या बहाण्याने साधला डाव

27 नोव्हेंबरच्या रात्री 27 वर्षीय महिला डॉक्टरवर या चौघांनी अमानुष अत्याचार केले. दारू पिऊन असलेल्या या आरोपांनी महिला डॉक्टर आपली स्कूटी पार्क करत असल्याचे पाहिले आणि त्यांनी आपली योजना आखली. त्यांनी स्कूटीची हवा काढून टाकली आणि मदतीचा बहाणा करून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्यांनी बलाकार केला आणि गळा दाबून तिची हत्या केली. आरोपी इथवरच न थांबता त्यांनी तिचे शव ट्रकमध्ये लादून टोलनाक्यापासून 25 किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावरून ते खाली फेकून दिले. पहाटे दूधवाल्याने शव पाहून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा अमानुष प्रकार उघडकीस आला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा