द्वारका

द्वारका हे भारताच्या चार धामपैकी एक धाम आहे, हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले असून याची स्थापना ५००० वर्षापूर्वी झाली होती. श्रीकृष्णांनी ह्या द्वारकेची स्थापना केली व तसेच मूळ द्वारका ही पाण्यावरच बांधली त्यांनी विश्वकर्माच्या मदतीने समुद्रात ९६ चौ.मैल असलेल्या जागेभोवती भक्कम किल्ला उभारला व त्यालाच द्वारका असे नाव दिले. त्या द्वारकेचे वेगळेच वैभव होते जसे तलाव सरोवर बांधली ज्यामुळे गावात घरांची संख्या वाढत वाढत ९०००० पर्यंत झाली. गावात दुकान, रस्ते, बगीचे वाढू लागले. गावात त्या काळात प्रत्येकाच्या घरात सोन्या-चांदीचे घड भरलेले असत.

येथील घरे ही संगमरवर पासून तयार करून त्यांना चांदीचे दरवाजे तसेच खांबांना रत्ने लाऊन सजवली जायची, गावामध्ये भरपूर प्रमाणात फळा-फुलांची झाडे असून बागांनी त्या गावाला वेगळी शोभा येत. श्रीकृष्णांच्या पश्चात ह्या द्वारकेसाठी आपापसात युध्द केली व मूळ द्वारका गावं  हे पाण्यात बुडून गेले व त्याच जागी नवी द्वारका उभारण्यात आली आहे.

ह्या नव्या द्वारकेला ६० खांब असून मंदिराचा ध्वज स्तंभ हा १७० फुट लांब उंचीचा आहे. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यास दोन तर भिंती आहे. श्रीकृष्णांची सुंदर अशी मूर्ती ही चांदीच्या सिंहासनात शोभून दिसते, त्या मूर्तीचे तोंड पूर्वेला असून ह्या मूर्तीला चार हात आहेत. ह्या नव्या द्वारकेची स्थापना २५०० पूर्वी झाली आहे. त्याचप्रमाणे कृष्णाला ८ बायका होत्या त्यापैकी दोन सत्यभामा व रुख्मिणी ह्या प्रमुख होत्या त्यापैकी रुक्मिणीचे मंदीर हे १२ व्या शतकात उभारण्यात आले आहे तसेच बेट द्वारका, सिध्देश्वर मंदीर, शंकराचार्याचे स्थापना पीठ आहे.

तसेच समुद्राच्या पाण्याचा अभाव हा मंदीरावर होऊ नये यासाठी त्याच्या भोवती जलदुर्गाचा तट उभारला आहे. तेथील अनेक स्थळे देखील बघण्यासारखी आहे जशी शंख, नारायण लक्ष्मी ,सत्यभामा, जांबुवती व देवकी यांची मंदीर आहे. येथे येणाऱ्या भक्तांसाठी व पर्यटकांसाठी लॉजची व्यवस्था आहे. तसेच बस, रेल्वे आणि विमानसेवा उपलब्ध आहे.