भिंगार शहराचा पाणी प्रश्न पोहचला थेट लोकसभेत-खा. डॉ. सुजय विखे यांनी अधिवेशनात वेधले केंद्र सरकारचे लक्ष

 

नगर- भिंगार शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेला पाणी प्रश्न आता थेट लोकसभेत पोहचला आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभेच्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात संसदेत आवाज उठवून या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन पाणीप्रश्न गांभीर्याने घेत नाही अशी तक्रारही त्यांनी संसदेत मांडली. खा. विखे यांची भिंगारच्या विविध समस्यांबाबत 2 दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती, या बैठकीत पाणी पुरवठा सुरळीतपणे व्हावा, चटईक्षेत्र निर्देशांकात वाढ करणे, कापूरवाडी तलावातील गाळ काढणे, याविषयीच्या व्यथा अनेकांनी खा. विखे यांच्या पुढे मांडल्या.

कॅन्टोन्मेंटचे संबंधित अधिकारी कर्मचारी पाणीप्रश्न खरी माहिती सांगत नाहीत. ते याबाबत लपवाछपवी करतात. त्यांच्याकडे कोणत्याही समस्या विषयी चौकशी केली असता व्यवस्थित माहिती मिळत नाही. कर्मचारी उद्धटपणे वागतात असेही सांगण्यात आले होते. भाजपा शाखेच्यावतीने याआधी पाणी प्रश्न सोडविण्याविषयी प्रयत्न केलेले आहेत. राज्य मंत्रालयात कॅबिनेटची बैठक घेऊन पाणीप्रश्नी काय निर्णय झाला, याची माहिती महेश नामदे यांनी दिली.

चटईक्षेत्र निर्देशांकात अंकात वाढ करावी, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉ. विखे यांच्याकडे केली. लोक गाव सोडून चालले आहेत, असे यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. खा. विखेंनी पाणीप्रश्नाची सर्व माहिती जाणून घेतली. लष्कराच्या एमईएसचे गँरिसन इंजिनिअर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ यांची संयुक्त बैठक घेऊन गावाला करारानुसार नियमित पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर एमआयडीसीकडून थेट कॅन्टोन्मेंटला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे खा. विखे यांनी सांगितले.

हा प्रश्न सोडविण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते करू असेही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात शुन्य प्रहारात बोलतांना अहमदनगर कॅन्टोंन्मेंट बोर्ड मार्फत रहिवाशी भागातील नागरीकांना पाणी पुरवण्याची जबाबदारी असताना कॅन्टोंन्मेंट मार्फत भिंगार येथील नागरीकांना गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमीत पाणी पुरवठा केला जातो. कॅन्टोंन्मेंटच्या अधिकार्‍यांकडुन व प्रशासनाकडुन नागरीकांना याबाबत समाधानकारक उत्त्र दिले जात नसल्यामुळे आधीच पाणी टंचाईने त्रस्त् नागरीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप् करावा व प्रशासनास योग्य् त्या सुचना द्यावी अशी मागणी खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी लोकसभेत केल