उपप्रवर्तिनी दिव्यज्योतीजी यांचा चातुर्मास सावेडी जैन स्थानकात

अहमदनगर- महाश्रमणी जिनशासन ज्योती गुरुमाता रामकुंवरजी यांच्या सुशिष्या उपप्रवर्तिनी दिव्यज्योतीजी अर्पणा, मधुर व्याख्याती दीप्तीश्रीजी, तपचक्रेश्‍वरी सौम्याश्रीजी, तपकौमुदी वैभवश्रीजी आदी ठाणा-5 यांचा आगामी 2019 चा चातुर्मास सावेडी जैन धर्मस्थानक येथे होत असल्याची माहिती अध्यक्ष जवाहर कटारिया व सेक्रेटरी संदीप गांधी यांनी दिली.

उपप्रवर्तिनी दिव्याज्योतीजी यांचा मागील 2018 चा चातुर्मास बेंगलोर (श्रीरामपुरम्) येथे झाला होता.

दिव्यज्योतीजी म.सा. ठाणा – 5 या बेंगलोर, पुणे, नाशिक असा विहार करुन आचार्यश्रीजी व युवाचार्यश्रीजी यांच्या दर्शनासाठी नगर येथे आलेल्या आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य उज्वलनगर येथील साध्वीभवन येथे आहे.

जैन बंधू-भगिनींनी त्यांच्या दर्शन, मांगलिक याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. अमृत कासवा व खजिनदार दिलीप मुथा यांनी केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा