केडगावला शिक्षिकेचा विनयभंग

अहमदनगर – जवळच्या नातेवाईकाकडुनच एका शिक्षिकेचा विनयभंग झाल्याची घटना केडगावला सोमवारी (दि.9) रात्री 10.30 ला घडली.

केडगाव परिसरात राहणारी एक 26 वर्षीय शिक्षिका तिच्या घरात झोपलेली असताना तसीम हमीद शेख आणि रूकसाना तसीम शेख (दोघे रा. खान मळा, लिंक रोड) हे दोघे त्या महिलेच्या घरी गेले. तसीम याने त्या शिक्षिकेचा हात धरून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत तिचा विनयभंग केला. त्यावेळी शिक्षिकेने यास विरोध केला म्हणुन रूकसाना शेख हिने तिस शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद या शिक्षिकेने कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी भादंविक 354, 452, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पोलिस हे.कॉ. पी.बी. भांबरकर हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा