महिन्यातून 2 वेळा 10 दिवसांचा नगरमध्ये डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम

अहमदनगर- डॉ. प्रमोद त्रिपाठी (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील डॉ. सुबोध देशमुख यांचा एकमेव द्वितीय असा ‘डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम’ हा 10 दिवसांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमांतर्गत दर महिन्यातूुन दोन वेळा 10 दिवसांची कार्यशाळा घेण्यात येईल. 16 ते 25 ऑगस्ट व 1 ते 10 सप्टेंबर रोजी सकाळी 7ः00 ते 8ः30 या वेळेत कार्यशाळा सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात होईल.

‘रोग जुना, उपचार नवा, सुखाचा क्षण, जीवनाचा हवा..’ याप्रमाणे फ्रीडम फ्रॉम डायबिटिसच्यावतीने मधुमेहींसाठी डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम आयोजित करण्यात येतो. विविध कार्यशाळांच्या माध्यमातून केवळ 3 महिन्यांत आतापर्यंत अनेकांचे वजन 3 ते 30 किलोपर्यंत कमी झाले आहे. कार्यशाळेत दररोज साखर तपासणी करून स्मुदी दिली जाते.

मधुमेह, तसेच वजन का वाढते याच्या कारणांची सखोल मीमांसा व त्या अनुषंगाने आहाराचे सखोल मार्गदर्शन, सणवार, उपवास, प्रवास, लग्नसमारंभात काय खावे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन, आपल्या तब्येतीच्या हिशेबाने योग्य व्यायाम शिकवले व करून घेणे, ताण-तणाव व त्याचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन, कोलेस्टेरॉल, ब्लडप्रेशर, थायरॉइड, वजन कमी करणे याबाबत व्यक्तिगत आहार व व्यायाम मार्गदर्शन, कार्यशाळेनंतर पुढील 3 महिने मोफत कन्सल्टेशन, सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीची बीसीए तपासणी मोफत आदी या कार्यशाळेची वैशिष्ट्ये आहेत.

हा कार्यक्रम चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी शास्त्रीय संशोधनावर सिद्ध केलेला आणि विश्‍वासार्हता प्राप्त केलेला आहे. या मार्गाचा अवलंब करून आतापर्यंत अनेकांना औषधे आणि इन्सुलिन घेण्याची गरज राहिलेली नाही. डॉ. प्रमोद त्रिपाठी (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी नगरमधील ही एकमेव कार्यशाळा आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी देशमुख क्लिनिक, आनंद साडीजवळ, सोनानगर चौक, कुष्ठधाम रोड, सावेडी, नगर, मो. 9822366371 व 7020512159 वर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा