धनसंपदा पतसंस्थेची अर्बन बँकेकडे 50 लाखांची नवीन ठेव

अहमदनगर- बँकेचे माजी चेअरमन अॅड. अशोक बोरा व माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या पुढाकारातून धनसंपदा ग्रामीण नागरी सह. पतसंस्थेचे अधिकारी श्री. गागरे यांनी पतसंस्थेची पन्नास लाखाच्या नवीन ठेवीचा चेक बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्याकडे सुपुर्द केला व बँकेवरील विश्वास प्रकट केला.

अॅड. अशोक बोरा यांनी सांगितले की, केवळ मोजक्या नियमबाह्य कर्ज प्रकरणांमुळे बँकेसमोर काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु, प्रशासकांनी परिस्थिती कौशल्याने हातळून बँकेची पुन्हा प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे बँकेकडे नवीन ठेवीचा ओघ वाढत आहे व बँकेवर प्रेम करणारे सर्वच माजी संचालक यासाठी प्रयत्नशील आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा