श्रीरामपूर – तालुक्यातील निमगाव खैरी येथील रहिवासी व नगर शहरातील प्रसिध्द करसल्लागार अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव देवेंद्र अण्णासाहेब पाटील हे मे 2019 मध्ये झालेल्या सीए (चार्टड अकौंटट) परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
देवेंद्र पाटील यांचे माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील आबासाहेब गरवारे येथे झाले. त्यांना पुणे येथील मे. एस. जी. सहस्त्रबुध्दे अॅण्ड असोसिएटसचे संचालक सीए संजीव सहस्त्रबुध्दे, सीए ओंकार रेखावार, नगरचे सीए बाळासाहेब सालपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.