अवयवदानावर उत्कृष्ट देखावा सादर करणार्‍या मंडळास 21 हजाराचे बक्षिस

नगर- फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवात नेत्रदान, अवयवदान व देहदानाची जनजागृती होण्यासाठी या विषयावर देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, या विषयांवर उत्कृष्ट देखावा सादर करणार्‍या गणेश मंडळास 21 हजार रुपयाचे बक्षिस जाहिर करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली. भारतात अनेक रुग्ण अवयवाच्या प्रतिक्षेत आहेत.

अवयदानाच्या अनेक गैरसमजुती समाजात पसरल्या असून, या विषयावर जनजागृतीचे कार्य फिनिक्स फाउंडेशन संस्था करीत आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकांनी मरणोत्तर नेत्रदान करुन अनेक अंधांना नवदृष्टी दिली आहे. या चळवळीचा प्रचार-प्रसार होण्यासाठी गणेशोत्सवात नेत्रदान, अवयवदान व देहदान विषयावर जास्तीत जास्त उत्कृष्ट देखावे सादर करण्याचे आवाहन गणेश मंडळांना फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

अवयवदानावर उत्कृष्ट देखावा सादर करणार्‍या गणेश मंडळास जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. मरणोत्तर अवयवदानाने अनेक गरजूंना नवजीवदान मिळणार असून, हे पुण्याचे कार्य असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा