डेबिट कार्डधारक घातले!

देशात आता डेबिट कार्डधारकांची संख्या 92.4 कोटींहून 82.4 कोटी झाली आहे. मॅग्नेटिक कार्डला इव्हीएम चिप आधारित कार्डात बदल केल्याने देखील कार्डधारकांच्या संख्येत घट झाली आहे. बहुतांश कार्डधारकांनी कार्डचे नुतनीकरण केलेले नाही. त्याचवेळी काही बँकांच्या विलिनीकरणानंतरही डेबिट कार्डच्या संख्येवर परिणाम झाला आहे. अलिकडेच बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँकेचे विलिनीकरण झाले आहे.

डेबिट कार्डच्या संख्येत कमी होण्यात पंजाब नॅशनल बँकेचे खातेदार आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे पीएनबीचे पाच कोटीहून अधिक कार्डधारक कमी झाले आहेत. बँक ऑफ इंडियाचे 2.2 कोटी, एसबीआयचे 1.9 कोटी कार्डधारक कमी झाले आहेत. अर्थात आरबीआयची ही आकडेवारी केवळ सक्रिय डेबिट कार्डधारकांची आहे. अशा स्थितीत कार्डमध्ये बदल केल्यानंतर संख्या वाढू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

क्रेडिट कार्डधारकांची संख्या वाढली

एकीकडे डेबिट कार्डधारकांची संख्या कमी होत असताना क्रेडिट कार्डधारकांची संख्या या तीन महिन्यात सुमारे दहा लाखांनी वाढली आहे. ती आता पाच कोटींपर्यंत पोचली आहे. देशातील क्रेडिट कार्डची संख्या एका वर्षात 3.86 कोटीहून 4.89 कोटींपर्यंत पोचली आहे. क्रेडिट कार्डधारकांत सर्वाधिक खातेदार एचडीएफसीचे आहेत. ही संख्या 1.25 कोटीपेक्षा अधिक आहे. त्याचवेळी एसबीआय आणि अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांची संख्या अनुक्रमे 87 लाख आणि 62 लाख आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा