अनोळखी मृतदेह आढळला

अहमदनगर – रेल्वे अपघातात ठार झालेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह बुधवारी (दि.14) रेजी 7.30 वाजण्याच्या सुमारास निंबळक परिसरात आढळून आला.

निंबळक रेल्वे स्टेशन लोहमार्गावरील स्टोन नंबर 359/3/4 जवळ रेल्वे कटींग झालेला एक इसम आढळून आला. त्याच्या अंगात निळसर चौकटी रंगाचा फुलबाहीचा शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पँट घातलेली आहे. मयत इसम हा रंगाने गव्हाळ, दाढी वाढलेली, मध्यम बांधा आहे.

याप्रकरणी एम.आय. डी.सी. पोलीसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधित तपास पो. ना. सय्यद हे करीत आहेत.

वरील इसमाबाबत कोणालाही काही माहित असल्यास त्यांनी एम.आय. डी.सी. पोलिसांना (फान नं. 2416123) वर संपर्क साधावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा