आगरकर मळा येथे गुरुवारी श्री गुरुदेव दत्त जयंती सोहळा

अहमदनगर- अर्बन बँक कॉलनी, आगरकर मळा, स्टेशनरोड येथील श्री नितीन गुगळे यांच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुवार, 12 रोजी दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी अभिषेक, होम, श्री दत्त बावन्नी वाचन, श्री दत्त जन्माचे वाचन, दुपारी महाआरती, त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी पालखी मिरवणूक तसेच रात्री 8 ते 10 महाप्रसाद व रात्री 10 वा शेजआरती अशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरु भक्त सेवा मंडळाने केले आहे.