खजूर रोल

साहित्य – चारशे ग्रॅम बिन बियाचा खजूर, दोन चमचे साय, काजू, पिस्ते, बदाम यांचा पाऊण कप भरड चुरा, दहा मारी बिस्किटांचा पूड.

कृती – एका जाड बुडाच्या पातेल्यात साय घालून वितळवावी. त्यावर खजूर बारीक करून टाकावा आणि मिश्रण कुस्करत कुस्करत आठ-दहा मिनिटे परतावे. बिस्किटाची दोन चमचे पूड बाजूला ठेवून उरलेली पूड या मिश्रणात टाकावी. मिश्रण नीट एकजीव करावे व उतरवावे.

आता एका अॅल्युमिनियम फॉईलवर बिस्किटांचा उरलेला चुरा भूरभूरावा व त्यावर हा खजुराचा गोळा आयताकृती लांब असा लाटावा. त्यावर काजू-पिस्ते-बदामाचा चुरा पसरावा. हलक्या हातानं फॉईलच्या मदतीने रोलप्रमाणे घट्ट गुंडाळून तसाच फॉईलसकट फ्रीजमध्ये ठेवावा. तीन-चार तासांनी हा रोल बाहेर काढून स्विस रोलप्रमाणे त्याच्या चकत्या कापाव्यात व थंडगारच द्याव्यात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा