श्री नटराज मंदिर चिदंबरम्

पुराणांमध्ये असलेल्या उल्लेखानुसार प्रभू शिव येथे ‘ॐ’कारच्या प्रणव मंत्ररूपात विराजमान आहेत. याचमुळे भक्तांसाठी या मंदिराचे स्थान महत्त्वाचे आहे. हे मंदिर भक्तांसाठी प्रचंड महत्त्वाचे आहे. भगवान शिवाच्या पाच भक्तिस्थळांपैकी चिदंबरम एक असून, हे स्थान शंकराचे आकाश क्षेत्र म्हणून ओळखले जाते.

नटराज मंदिराला अग्नी मूल म्हणूनही ओळखले जाते. भोलेनाथ येथे ज्योतीरूपात विराजमान असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे. इतर चार क्षेत्रांमध्ये कालाहस्ती (आंध्र प्रदेश) किंवा वायू, कांचीपूरमचे पृथ्वी, तिरुवनिका- जल आणि अरुणाचलेश्वर (तिरुवनामलाई) म्हणजेच अग्नी यांचा समावेश आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार याच पंचतत्त्वांनी (पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश) मानवी शरीराची निर्मिती झाली आहे.

नटराज मंदिराला अग्नी मूल या नावानेही ओळखले जाते. मंदिराची रचना अत्यंत सुबक व आकर्षक असून, वैशिष्ट्यपूर्ण आहे. चार सुंदर आणि मोठ्या घुमटांमुळे मंदिर भव्य वाटते. मंदिराची अंतर्गत रचना, सजावट, शिल्पकारी आणि मंदिराचे व्यापक क्षेत्रफळ यामुळे ते सहज डोळ्यांत भरते. शिवाच्या नटराज स्वरूपातील मूर्तीमुळे भरतनाट्यम कलावंतांचेही हे श्रध्दास्थान आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबावर भरतनाट्यम नृत्याच्या वेगवेगळ्या शैली दाखविणा-या मूर्ती आहेत. मंदिराच्या गाभा-यात भगवान शिवकाम सुंदरी (पार्वती) सह स्थापित आहेत.

मंदिराची देखरेख आणि पूजाविधी पारंपरिक पुजारींकडून केली जाते. मंदिराला भक्तांकडून दिल्या जाणा-या देणगीतूनच मंदिराचे कामकाज चालविले जाते. शिवक्षेत्रम म्हणूनही मंदिर ओळखले जाते. भगवान गोविंदाराज यांची मूर्तीही मंदिरात शिवशंकराजवळच स्थापन करण्यात आली आहे. मंदिर परिसरात अत्यंत सुंदर तलाव आणि नृत्य परिसर आहे. येथे दरवर्षी होणा-या नृत्य कार्यक्रमासाठी दूरदूरहून कलावंत सहभागी होत असतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा