ग्वाल्हेर:
पेशव्यांच्यावतीने (पेशवे हे सातारला मराठी साम्राज्याची गाडी होती व तेथे राजे असत त्यांच्यावतीने) शिंदे हे मध्य भारताचा व उत्तर भारताचा कारभार सांभाळीत. दिल्लीच्या राजकारणावर त्यांचे सतत लक्ष असे व दराराही असे.
पानिपतच्या लढाईत या तीनही जणांनी लढाईत भाग घेतला. पुढे पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला व तेथेच त्यांचा अंत्यसंस्कार केला गेला व स्मारक उभारले. पुण्याजवळचे बाणेर हे त्यांचे मूळ गावं. म्हणून इतिहासात महाद्जींचा उल्लेख बाणेरकर शिंदे असा केलेला आहे.
किल्ला :- सध्याचा किल्ला मानसिंगने सन १४८६ ते १५१६ या काळात बांधला. २ मैल लांब व ३५ फुट उंच अशी याची तटबंदी आहे. किल्ला ३० फुट उंचीच्या गढीवर बांधलेला आहे.
१४ व्या शतकात तटबंदीच्या बाहेरच्या बाजूवर ७६५ बुद्ध मूर्ती उभारल्या आहेत. किल्ल्याची व्याप्ती १० चौ.मैल इतकी आहे. येथे ५ घराण्यांनी राज्य केले आहे. ती घराणी आहेत कछवाह, प्रतीहारा, सोमथ, इस्लामिक व शिंदे. सुरजपाल हा पहिला राजा होता.
मार्ग – ग्वाल्हेर विमानतळ शहराच्या मध्यभागी पासून 8 किमी अंतरावर स्थित आहे. हे विमानतळ भारतातील प्रमुख शहरांना जोडले आहे.
रेल्वे स्टेशन लहान – मोठ्या शहरांना जोडलेले आहे. बससेवा तसेच खाजगी टेक्सी सेवाहि उपलब्ध आहे.