माशांची विनवणी

एक कोळी मासे पकडण्यासाठी गळ टाकून नदीकाठी बसला असता थोड्याच वेळात त्याच्या गळाला एक मासा लागला. त्याला वर काढून टोपलीत टाकणार, तोच तो मासा गयावया करीत कोळ्याला म्हणाला, ‘‘कोळीदादा, माझ्यावर दया दाखव. मला परत पाण्यात सोडून दे.

मी अजून लहान बच्चा आहे. चांगले खाईन-पिईन, धष्टपुष्ट होईन; मग येऊन तू मला खा.’’ यावर कोळी म्हणाला, ‘‘अरे, तुला सोडून देण्याइतका का मी मूर्ख आहे? उद्याचा काय भरोसा? हाती लागलेला माल टाकून मी उद्याची आशा करीत बसलो, तर माझ्यावर उपाशी मरण्याची वेळ येईल.’’

तात्पर्य – हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावणे, हा खरे तर मूर्खपणाच.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा