दादासाहेब काजळे यांना नेट परीक्षेमध्ये यश

अहमदनगर- येथील प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील कार्यालयात कार्यरत असलेल्या दादासाहेब रंगनाथ काजळे (रा.कान्हेगाव, ता.कोपरगाव) यांनी युजीसीने घेतलेल्या शिक्षणशास्त्र विषयासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेटमध्ये सुयश मिळवले. 21 जूनला अहमदनगर केंद्रावर ही परीक्षा झाली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या कार्यालयात कार्यरत असतानाही त्यांनी नियोजनबद्ध कठोर परिश्रम घेऊन नेट परीक्षेमध्ये सुयश मिळवले. यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र चोभे यांनी प्रोत्साहन दिले. तर नाशिक येथील समर्थ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गोकुळ मोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

दादासाहेब काजळे यांनी अल्पकाळात मिळवलेल्या यशाबद्दल डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, कार्यवाह प्रा.सोमनाथ दिघे, डॉ.भानुदास देशमुख, अरूणराव धर्माधिकारी, अभयराव जामगांवकर, मिलिंद चवंडके, प्रकाश गटणे, भरत निंबाळकर, अशोकराव मुळे, सेवकवृंद, कार्यालयीन कर्मचारी, प्राध्यापक वृंद तसेच कान्हेगावचे सरपंच आहेर, उपसरपंच अण्णासाहेब काजळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा