हाच कापूसचोर

एकदा कापसाच्या वखारीत काम करीत असलेल्या सात-आठ नोकरांपैकी एकाने बरीच मोठी कापसाची एक गासडी चोरली आणि पैसे घेऊन कोणाला तरी विकली. हि गोष्ट माकडाला समजताच त्याने सर्वाना दम देऊन विचारले; प्रत्येकजण आपण गासडी चोरली नाही, ’असे शपथ घूउन सांगू लागले .शेवटी वैतागून मालकाने हे प्रकरण बिरबलाकडे नेले.

बिरबलाने सर्व नोकरांना आपल्याकडे बोलावून एका रांगेत समोरच उभे केले. त्या सर्वाना एकदा पाहून तो खो खो हसत सुटला. त्याचा मालकाला खोटेच म्हणाला,

”मालक, ज्या नोकराने डोक्यावर ठेवून कापसाची गासडी पळवली, त्यांचा मुंडाशाला कापूस लागलेला आहे. त्याने तो झटकण्याची काळजी न घेतल्यास तो आयताच आपल्या हाती लागला”.

बिरबलाने असे मानतच ज्या नोकराने चोरी केलीहोती, तो आपले मुंडासे चाचपडू लागला. लागलीच ‘हाच कापूसचोर असणार,’ हे बिरबलाने ओळखले आणि त्या नोकराला फटक्याची धमकी द्देतच त्या नोकराने कापसाची गासडी चोरून नेल्याचे कबूल केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा