त्वचा व केसांच्या समस्यांसाठी अद्यावत उपचार आता नगरमध्ये उपलब्ध – नगरसेविका सौ. शितल जगताप

तारकपुर कोर्टयार्ड मध्ये ‘कॉस्मो स्किन व हेअर क्लिनिक’चा शुभारंभ

अहमदनगर- सध्या हिवाळ्यातील थंडी आणि वातावरणातील कोरडेपणा यामुळे त्वचेवर परिणाम होऊ न देता निरोगी त्वचा राहण्यासाठी घरगुती उपयांबरोबरच त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेणे चांगले असते. त्वचा व केसांच्या समस्यांसाठी अद्यावत उपचार आता नगरमध्ये उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन नगरसेविका सौ. शितलताई जगताप यांनी केले.

तारकपुर येथील कोर्टयार्ड मध्ये कॉस्मो स्किन व हेअर क्लिनिकचा शुभारंभ नगरसेविका सौ.जगताप व ज्योती दीपक यांचे हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या. या शुभारंभप्रसंगी नगरसेविका ज्योती गाडे, डॉ.श्रद्धा जाधव, संध्या चव्हाण, मंगल जाधव, विमल ठाकरे, हौसाबाई राऊत, यमुनाबाई झिंजुर्डे, उद्योजक मोहनलाल मानधना, अभिजित खोसे, सचिन जगताप आदि उपस्थित होते.

सौ.जगताप पुढे म्हणाल्या, व्यावसायिक स्पर्धेत आता नगर मागे राहिले नाही. वैद्यकीय सेवा, वस्त्रदालन, मॉल्स अशा सेवेसाठी नगर प्रसिद्ध होत आहे. डॉ.निलम वाखुरे यांनी कॉस्मो स्किन व हेअर क्लिनिकच्या माध्यमातून अद्यावत मशिनद्वारे केशरोपण, केसांच्या समस्या तसेच त्वचारोगावर सवलतीच्या दरात उपचार देऊन नगरकरांना दिलासा देतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

डॉ.श्रद्धा जाधव यांनी भाषणात त्वचा चांगली राहण्यासाठी हिवाळ्यात हॅण्ड क्रिम तसेच फ्रुट क्रिमचा वापर करा. बाहेर पडतांना हात-पाय झाकून निघत जा. आठवड्यातून एकदा गरम तेलाने शरीराची मॉलीश करत जा, असा सल्ला दिला.

नगरसेविका ज्योती गाडे व ज्योती दिपक यांनी या क्लिनिकमुळे नगरकरांना त्वचारोगाबरोबरच केशरोपण व केसांच्या समस्यांबाबत सर्व निदान होऊन योग्य मार्गदर्शन व उपचार मिळतील. डॉ.निलम यांचा या क्षेत्रातील अनुभव, विशेष प्रशिक्षणाचा फायदा होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

प्रास्तविकात डॉ.निलम वाखुरे यांनी सांगितले की, कॉस्मो स्किन व हेअर क्लिनिकच्या माध्यमातून चांगली सेवा देतांना त्वचारोगावर आधुनिक पद्धतीने उपचार सवलतीच्या दरात करण्याचा माझा मानस आहे. मुरुम, मुरुमाचे डाग, डोळ्याखालील काळे डाग, फोटो फेशियल, हायपर पिगमेंटेशन, स्किन पॉलिसिंग, चामखिळ, टॅटू रिमुवल, तिळ काढणे, अॅन्टी एजिंग, केशरोपण व इतर उपचार पद्धतीने निदान करणार आहे, असे सांगितले.

या उद्घाटन सोहळ्यास इंजि.लक्ष्मणराव वाखुरे, प्रदीप वाखुरे, डॉ.निलम यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते विपुल वाखुरे, शितल पवार, स्वप्नजा वाखुरे, जया वाखुरे, जना वाखुरे आदिंसह मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. सर्वांचे स्वागत बीएसएनएलचे जनसंपर्क अधिकारी कल्याण वाखुरे यांनी केले तर विनय वाखुरे यांनी आभार मानले.