शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘कोरोना जागरूकता अभियान’, विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

अहमदनगर – कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. अशा वेळी त्यावरील उपाययोजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असून याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने इंडस वर्ल्ड स्कूलने ‘कोरोना जागरूकता अभियान’ हाती घेतले आहे, अशी माहिती संचालक विनायक देशमुख यांनी दिली.

संचालिका सौ. प्राजक्ता धस म्हणाल्या, या अंतर्गतविद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.

संचालक विनायक देशमुख म्हणाले, सध्या लॉकडाऊन मुळे विद्यार्थी व बहुसंख्य पालक घरीच आहेत. त्यामुळे स्पर्धांबाबत पालकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबामध्ये कोरोना संदर्भात जागरूकता निर्माण होईल.

पहिल्या टप्प्यात या स्पर्धा इंडस वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असून लवकरच जिल्ह्यातील अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांसाठीही अशा स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस श्री. देशमुख यांनी व्यक्त केला.

स्पर्धेच्या तपशीलाबाबत माहिती देताना प्राचार्य कविता सुरतवाला यांनी सांगितले, पहिल्या टप्प्यात चित्रकला स्पर्धा होणार असून, आनंदा (पूर्व प्राथमिक ते इ. दुसरी), जिज्ञासा (इ.३ री ते इ.६ वी) व साधना (इ.७वी. ते इ.१०वी) अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. आनंदा गटासाठी मुखवटा(मास्क) व घोषवाक्य, जिज्ञासा गटासाठी ‘कोरोना विरुद्ध लढा’,(मास्क, हॅन्डवॉश, सोशल डिस्टंसिन्ग चा वापर) तर साधना गटासाठी ‘कोरोना योद्ध्यांना सलाम’ व ‘लॉकडाऊन नंतरचे कोरोना सोबत जीवन’ हे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेतील गट निहाय उत्कृष्ट चित्रांना भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेसाठी विद्यार्थी आपली चित्रे व्हाट्सअप, मेल द्वारे पाठवणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक रश्मी कुमारी, श्रद्धा ठाकूर, नीलिमा पवार, कलाशिक्षक स्वप्निल दरवडे यांच्यासह अन्य शिक्षक परिश्रम घेत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा