हजारो वर्षांपूर्वीच्या नारळाशी संबंधित काही खास गोष्टी..

नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. असे मानले जाते की, भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता, त्यावेळी सोबत तीन गोष्टी आणल्या होत्या. लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनू. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तीनही देवांचा वास मानला गेला आहे. श्रीफळ महादेवाचे परमप्रिय फळ आहे. नारळामध्ये असलेल्या तीन डोळ्यांना त्रिनेत्र स्वरूपात पाहिले जाते.

श्रीफळ शुभ, सुखसमृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. सन्मान करण्यासाठी श्रीफळ आणि शाल दिली जाते. सामाजिक चालीरीतींमध्ये नारळ भेट देण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्यावेळी नारळाची पूजा केली जाते. एका ताज्या, हिरव्या नारळाची मलई खाल्ल्यास, दर दिवसाला शरीराला आवश्यक असणारे मँगनीज मिळतं. या मलईत १५ टक्के पोटॅशिअम असतं, जे आपले स्नायू, हाडं आणि पचनसंस्थेला कार्यरत ठेवतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत आणखी एक महत्त्वाचं खनिज असतं. ते म्हणजे मॅग्नेशिअम. हे खनिज ऊर्जानिर्मितीसाठी तसंच मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं.

झोपताना नारळपाणी प्यायल्यास शरीरातील नाड्यांना बळ मिळते. या पाण्यामध्ये पोटॅशियम आणि क्लोरीन असते, जे आईच्या दुधासमान असते.

नारळ वातशोधक, पुष्टीकारक, बलवर्धक आणि वातपित्त व रक्तविकार नाशक आहे.

ज्या लहान बाळांना दूध पचत नाही, त्यांना दुधासोबत नारळपाणी पाजावे.

लहान बाळांना डिहायड्रेशन झाल्यास, नारळ पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून ते पाणी पाजावे.

नारळातील मलई खाल्ल्याने कामशक्ती वाढते.

गर्भवती स्त्रीने नारळपाणी प्यायल्यास, शारीरिक दुर्बलता दूर होते आणि सुंदर, गुटगुटीत बाळ जन्माला येते.

नारळातील ओलं खोबरं खाल्ल्यास डोळे चांगले राहतात.

पौष, माघ आणि फाल्गुन महिन्यात नियमित सकाळी गुळासोबत नारळ खाल्ल्यास वक्षस्थळामध्ये वृद्धी होऊन शारीरिक दुर्बलता दूर होते.

महिला नारळ फोडत नाही, यामागे एक कारण आहे. नारळ बीज स्वरूपात आहे, यामुळे याला उत्पादन (प्रजनन) क्षमतेशी जोडले गेलेले आहे. देवीदेवतांना श्रीफळ अर्पण केल्यानंतर पुरुषच नारळ फोडतात. नारळाच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा