पायनॅपल मावा फ्रूट चॉकलेट

साहित्य – मावा 50 ग्रॅम, पायनॅपल पल्प 75 किंवा 100 ग्रॅम (चवीप्रमाणे), थोडी साखर (2 चमचे), थोडे तूप.

कृती – मावा तुपात भाजा. भाजत आल्यावर पायनॅपल पल्प टाका. घट्ट होईपर्यंत हलवा. नंतर 2 चमचे साखर टाका. परत घट्ट होईपर्यंत मंद आचेवर परतवा. घट्ट झाल्यावर खाली उतरवा. जरा थंड झाल्यावर बारीक गोल गोळ्या करा. जरा सुकू द्या.

नंतर त्याला चॉकलेट रॅपिंग पेपरमध्ये रॅप करा. फ्रिजमध्ये 15 मिनिटे ठेवा. नंतर बाहेर काढा. (फ्रूट पल्प तुमच्या आवडीप्रमाणे चिकू, अॅपल, बनाना, पेरू, द्राक्ष इ. फळांचा घेऊ शकता.)