चीनची गुंतवणूक भारताकडे वळणार?

चीनमधील अतिरिक्त भांडवल भारतात येण्याची शक्यता महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापारयुद्ध भडकलेले आहे. त्या अवस्थेत चीन भारतात आपली निर्मिती केंद्रे तयार करू शकतो. त्यामुळे चीनची भारतातील गुंतवणूक वाढू शकते. जरी चीन आणि अमेरिकेदरम्यानचे मतभेद मिटले तरी चिनी कंपन्यांना भारताचा उपयोग करण्याची गरज पडणार आहे. त्यामुळे चीन भारताबरोबरचे व्यापारीसंबंध सुधारण्याची शक्यता आहे.

चीन आपले काही कारखाने भारतामध्ये हलविण्याची शक्यता आहे. चीन आणि अमेरिका यांचा व्यापार प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात थंडावला तरी तो भारतासारख्या देशाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या चालूच राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा फायदा भारताने घेण्याची गरज आहे महिंद्रा यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा