चाईल्ड इन्शुरन्स गरजेचाच

भारतात शिक्षणावर होणारा खर्च हा दरवर्षी महागाईदरापेक्षा अधिक वेगाने वाढत चालला आहे. अशा स्थितीत एक जबाबदार पालक हे आपल्या मुलाच्या सुरक्षित भवितव्याचा नेहमीच विचार करत असतात. म्हणूनच मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करणे क्रमप्राप्त ठरते. आजघडीला एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षणाचा खर्च हा पंधरा लाखाच्या आसपास आहे. तो वीस वर्षानंतर पाच टक्के चलनवाढ गृहित धरुन 38 लाख रुपये होण्याची शक्यता आहे. साहजिकच अगोदरच योजना केल्यास चलनवाढीच्या दराबरोबरच शिक्षणाचा खर्च वाढला तरी त्याचा बोजा पडणार नाही. मुलांच्या शिक्षणाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला चाइल्ड इन्शूरन्स प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

मुलांच्या योजना जाणून घेताना : एक चाइल्ड इन्शूरन्स प्लॅन पॉलिसीधारकाच्या निधनानंतरच्या स्थितीत एकरक्कमी भरपाई तात्काळ प्रदान करते आणि पॉलिसीही सक्रिय राहते. त्यानंतर भविष्यातील सर्व हप्ते माफ होतात आणि विमा कंपनी पॉलिसीधारकाकडून पैसे भरत राहते. चाइल्ड इन्शूरन्स प्लॅननुसार मुलांच्या अभ्यासादरम्यान अटीतटीच्या काळात विमा कंपनी मुलांच्या गरजा भागवण्यासाठी भरपाई देत राहते.

डेथ बेनिफिट: चाइल्ड इन्शूरन्स प्लॅनचा वास्तविक विचार करताना पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास त्याचा लाभ मुलांना होतो. ही भरपाई पारंपारिक चाइल्ड प्लॅनच्या सम अॅश्यूर्ड रक्कमेच्या बरोबरीने असते. यूनिट लिंक्ड चाइल्ड प्लॅनमध्ये सम अॅश्यूर्ड किंवा फंड व्हॅल्यू यापैकी जी रक्कम अधिक असेल, तेवढी भरपाई विमा कंपनीकडून केली जाते.

मॅच्यूरिटी बेनिफिट: आपली चाईल्ड पॉलिसी मॅच्यूर झाल्यानंतर विमा कंपनी आपल्या मुलांना (नॉमिनी) पारंपारिक प्लॅनमध्ये सम अॅश्यूर्डबरोबरच दुसरे काही लाभ प्रदान करते. जर आपण यूनिट लिंक्ड प्लॅन घेतला असेल तर कंपनी फंड व्हॅल्यूच्या प्रमाणात भरपाई देते.

मनी बॅक पॉलिसी : बहुतांश चाइल्ड प्लॅन हे नियमित अंतरानंतर भरपाई देत राहते. या आधारावर मुलांना आयुष्यात विविध टप्प्यावर आपली आर्थिक गरज भागविण्यास मदत मिळते.

अतिरिक्त लाभ : चाइल्ड प्लॅनमध्ये इन्शूरन्स कंपन्या पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त लाभ प्रदान करते. यानुसार मॅच्यूरिटीवर सम अॅश्यूर्डपेक्षा अधिक भरपाई दिली जाते. यूनिट लिंक्ड चाइल्ड प्लॅन असल्यास कंपनी आपल्याकडून अतिरिक्त फंड यूनिट ग्राहकांना प्रदान करते.

आंशिक प्रमाणात पैसे काढण्याची मूभा : चाइल्ड इन्शूरन्स पॉलिसीत आपल्याला आंशिक रुपाने पैसे काढण्याचा पर्याय देखील मिळतो. या पर्यायाच्या मदतीने आपण आर्थिक गरजा दूर करण्यासाठी पैसा काढू शकता.

कर सवलत : चाइल्ड इन्शूरन्स प्लॅन खरेदी करताना आपल्याला प्राप्तीकर कायदा कलम 80 सी नुसार हप्त्याच्या रकमेपोटी कर सवलत मिळवू शकता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा