केमिस्ट संघटनेचे सुरु असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी – आ. संग्राम जगताप 

अहमदनगर – नगरच्या केमिस्ट असोसिएशनचे सर्व सदस्य व्यवसाय करण्याबरोबरच एकत्र येवून समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत आहेत. गरजूंना मदतीचा हात देत आहेत. दुष्काळात शेतकर्‍यांचे पशुधन वाचविण्यासाठी चारा तसेच पाण्याचे टँकर, पूरग्रस्तांना मदत, वारकर्‍यांना औषध वाटप हे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

केमिस्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र बेंद्रे यांच्या पुढाकारातून अरुणोदय गोशाळेत मुक्या जनावरांसाठी चारा वाटप तसेच रिमांड होम येथे निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष सुधीर लांडगे, जिल्हा सचिव राजेंद्र बलदोटा, आनंद बोरा, शरद डोंगरे, संदीप कोकाटे, राहुल गोरे, महेश आठरे, सचिन मोरे, संकेत गुंदेचा, हेमंत गुगळे, नितीन गांधी, अविनाश साळुंखे, मिलिंद क्षीरसागर, महेंद्र ओसवाल, नितीन बोठे, शशिकांत वाघुलकर, अमोल बोठे, ज्योती गहिले, दिपाली शेवाळे, मनीषा बारगळ आदी उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप पुढे म्हणाले, रिमांड होम येथील महापालिकेच्यावतीने चालविण्यात येणार्‍या शाळेतील निराधार विद्यार्थ्यांना मदतीची खरी गरज आहे. ती मदत या मुलांना केमिस्ट असोसिएशनचे सर्व सदस्य करत आहेत. ही मोठी कौतुकाची आणि समाधानाची बाब आहे.

असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र बेंद्रे म्हणाले, केमिस्ट संघटनेतर्फे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. मागील दुष्काळात संघटनेने शेतकर्‍यांचे पशुधन वाचविण्यासाठी चारा तसेच पाण्याचे टँकर ग्रामीण भागात दिले होते. समाजाप्रती आपली काहीतरी बांधिलकी असते, ती जपण्यासाठी हे उपक्रम सातत्याने राबविले जातात. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते पार पडण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला गेला आहे असेही ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा