चव्हाण विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

अहमदनगर – नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे अभिनेते मोहिनीराज गटणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी बाळासाहेब चव्हाण होते. प्राचार्या सौ.सुनंदा घाडगे यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भिमाजी कोकणे, विश्‍वस्त ज्ञानेश चव्हाण, नितीन घाडगे उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक शिवाजीराव घाडगे सर, प्राथ. मुख्याध्यापक रंगनाथ बोबडे, प्रा.दीपक कळसे उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.जाधव यांनी केले तर प्रास्तविक संतोष उरमुडे व आभार बाबासाहेब बनकर यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा