अहमदनगर- गणेशोत्सवात सर्वत्र मोठ्या प्रमाणात उत्सवाची धामधुम असते. अशाप्रसंगी तृतीयपंथी यांना कोणीही या उत्सवात सहभागी करुन घेत नाहीत. मात्र चौपाटी कारंजा मित्र मंडळाने तृतीयपंथींच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करुन सामाजिक जाणिव जपत आमचा सन्मान केला आहे, असे प्रतिपादन तृतीयपंथी संघटनेचे जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांनी केले.
चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्टच्या श्री गणेशाची तृतीयपंथी संघटनेचे जिल्हाध्यक्ष काजल गुरु, सदस्य रिटा गुरु, मुस्कान, गौरी, धनश्री, छकुली यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तृतीयपंथींना आरतीचा मान देण्याबरोबरच मंडळाच्यावतीने सर्वांचा सत्कारही करण्यात आला.