चार्जिंग एकदा, धावेल ७२५ किमी

पेट्रोल, डीझेल बरोबर आता इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे ग्राहकाचा कल वाढत चालला आहेच. याचवेळी एक नवीन सोलर कार सादर करण्यात आली असून लाईटईअर या कंपनीने त्यांची नवी सोलर कार लाईटईअर वन नावाने हॉलंडमध्ये सादर केली आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे ती एका चार्ज मध्ये चक्क 725 किमी अंतर तोडणार आहे. मायलेजच्या कारणावरून ही कार आत्ताच चर्चेत आली आहे. सोलर पॉवरवर इतके अंतर कापणारी ही जगातील पहिली कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या पाच सीटर कारच्या टपावर आणि बॉनेटवर 5 चौरस मीटरची सोलर पॅनल बसविली गेली असून ती वजनाला अगदी हलकी आहेत.

ही पॅनल वजनाला हलकी असली तरी जलद गतीने पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहेत. छतावर सेफ्टी ग्लास बसविली गेली आहे. ही काच इतकी मजबूत आहे कि माणूस उभा राहिला तरी त्यावर चरा येत नाही. या कारसाठी सोलर चार्ज बॅटरी तंत्रज्ञान वापरले गेले आहे. चारी चाकात चार इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या गेल्या आहेत. सूर्य असताना ड्रायविंग केले जात असेल तर कारचे सेल अपोआप चार्ज होत राहतात पण समजा ढग असतील तरी ही कार घरातील सॉकेटवर सुद्धा वीज वापरून चार्ज करता येणार आहे. त्यासाठी 230 व्होल्टचा प्लग पुरेसा ठरेल असे कंपनीचे म्हणणे आहे. रात्रभर विजेवर कार चार्ज केली तर ती 400 किमी अंतर धावू शकेल.

कंपनीने सध्या या कारचे प्रोटोटाइप सादर केले असून 2021 पासून या कार विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कंपनी सध्या अश्या 500 कार्स तयार करणार असून त्यातील 100 कार्ससाठी बुकिंग झाले असल्याचे सांगितले जात आहे. या कारची किंमत 1,35,000 पौंड म्हणजे 94 लाख रुपये असून अडव्हांस बुकिंगसाठी सुमारे तीन चतुर्थांश रक्कम भरावी लागणार आहे. लाईटईअर कंपनी 2016 मध्ये स्थापन करण्यात आली असून सध्या येथे 100 कर्मचारी आहेत. या कंपनीत टेस्ला, फेरारी मधून नोकरी सोडून इंजिनिअर्स आल्याचे समजते. कंपनीकडून असेही सांगण्यात आले आहे, कि नेदरलंड सारख्या देशात जेथे सूर्य कमी वेळ असतो तेथेही ही कार 40 टक्के सोलर पॉवर वापरून चार्ज होऊ शकेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा