विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या पूजा कुर्‍हे हिच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी

चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठाच्यावतीने अधिक्षकांना निवेदन

अहमदनगर- विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या कु.पुजा कुर्‍हे हिच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाजपा व चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने महावितरणचे अधिक्षक अभियंता यांना देण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बोचूघोळ, दत्ता गाडळकर, अभय बडे, राजेंद्र सातपुते, चंद्रकांत जाधव, ऍड.अमोल थोरात, ऍड.दिपक वाऊत्रे, विजय मडके आदि उपस्थित होते.

वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर पोलिस मुख्यालयातील वसाहतीत राहणार्‍या पोलिसाची मुलगी कु.पूजा सुनिल कुर्‍हे या मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे. पावसामुळे घरावरील पत्रे व भिंतीला करंट उतरला होता, चार दिवसांपूर्वी एमएसईबी यांच्याकडे तशा प्रकारची पूर्व कल्पना वजा तक्रार करण्यात आलेली होती, मात्र त्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली गेली नाही व संबंधीत वीज वाहक तारांची उपाय योजना केली गेली नाही व या हलगर्जीपणामुळे वीज वाहक तारांतून घराच्या भिंती व पत्रे यामध्ये करंट उतरुन मुलगी पूजा हिचा मृत्यू झालेला आहे.

सदरची बाब अतिशय गंभीर असून असा प्रकार वारंवार घडत आहेत व वारंवार विजेचा झटका लागून अनेकांना मृत्यू ओढावत आहे हा प्रकार थांबावा या हेतूने योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक आहे.

विजेचा शॉक लागून मुलगी कु.पूजा सुनिल कुर्‍हे हिचे झालेल्या मृत्यूस जबाबदार अधिकार्‍यांवर त्वरीत कायदेशीर कार्यवाही करावी. अन्यथा भाजपा व चंद्रशेखर आजाद युवा प्रतिष्ठान, चौपाटी कारंजा यांच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा