शिशु संगोपन संस्थेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

अहमदनगर- शिशु संगोपन संस्थेचे सविता रमेश फिरोदिया प्रशाला, श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल संलग्न महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय माळीवाडा, नगर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात पार पडला. याप्रसंगी ध्वजारोहण सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सविता रमेश प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गांधी यांनी भाषणात विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे हा कामगार दिन मानला जातो. विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करावा. जिद्द चिकाटी ठेवावी.

शाळेला यश मिळवून द्यावे. जीवनात मनापासून कष्ट केले की, यश आपोआप आपल्या पदरी पडते. देशाची प्रगती करा म्हणजे यशाचे शिखर गाठता येईल. यावेळी प्राचार्या सौ. कांचन गावडे, संस्थेचे लेखनिक विनोदकुमार कटारिया, प्रा. संजय शेवाळे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. वरखडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पांडुरंग मिसाळ यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा