सॉर क्रीम कॉफी केक

साहित्य-
टॉपींगसाठी-
१/४ कप ब्राउन शुगर, चेपून भरलेली
१ टीस्पून दालचीनी पुड
३/४ कप अक्रोड
केकसाठी-
१ कप घट्टसर सॉर क्रीम
१ टीस्पून बेकिंग सोडा
१ + ३/४ कप मैदा
दीड टीस्पून बेकिंग पावडर
१/२ कप अनसॉल्टेड बटर, रूम टेम्प.
१ कप साखर
१/२ टीस्पून मीठ
२ टीस्पून वनिला एक्सट्रॅक्ट

कृती:
ओव्हन ३५० F वर प्रीहिट करावे.
१) टॉपींग: अक्रोड ओव्हनमध्ये ८ ते १० मिनिटे टोस्ट करून घ्यावे. अक्रोड टोस्ट झाले कि बाहेर काढून थोडे गार होवू द्यावे. शार्प सुरीने भाजलेले अक्रोड भरडसर चिरावे. किंवा मिक्सरमध्ये अगदी किंचित फिरवावे. आपल्याला थोडा भरडसर अक्रोड हवे आहेत. यात दालचीनी पावडर आणि ब्राउन शुगर घालून मिक्स करावे. हे मिश्रण केकचे मिश्रण तयार होईस्तोवर बाजूला ठेवावे.
२) मध्यम वाडग्यामध्ये सॉर क्रीम आणि बेकिंग सोडा एकत्र करून मिक्स करावे.
३) दुसऱ्या एका भांड्यात मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे.
४) एका मोठ्या मिक्सिंग बोलमध्ये बटर, साखर, आणि मीठ एकत्र करून मिश्रण हलके होईस्तोवर फेटावे (साधारण २ ते ४ मिनिटे). वानिला इसेन्सही घालावे आणि फेटावे.
५) मैदा ३ बॅचेसमध्ये घालावा. प्रत्येक बॅच नंतर अर्धे सॉर क्रीम घालावे आणि मिक्स करावे.
६) २ बेकिंग पॅन घ्यावेत (८” x ८” x २”). पॅनला आतून चांगले बटर लावून घ्यावे. मिश्रणाचे २ सारखे भाग करून पॅनमध्ये घालावे. त्यावर टॉपिंग घालावे. ओव्हनमध्ये साधारण ३० ते ३५ मिनिटे बेक करावे. (३० मिनीटांनंतर केक बाहेर काढून विणकामाच्या सुईने किंवा स्क्युअरने केकच्या मध्यभागी आतपर्यंत टोचून पहावे. सुई जर एकदम क्लीन बाहेर आली तर केक झाला. सुईवर जर ओलसर केक बॅटर लागलेले असेल तर अजून काही मिनिटे केक बेक करावा.)
केक बेक झाल्यावर गार होवू द्यावा. सुरीने पॅनच्या कडेने सोडवून घ्यावा. कापून सर्व्ह करावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा