घरफोडी करणार्‍या दोघांना अटक

अहमदनगर- भिंगार शहरात घरफोडी, चोरी करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. ही कारवाई गुरूवारी (दि.8) करण्यात आली. याबाबतची हकीकत अशी की, शैलेश विलास सरोदे (रा. रंगारगल्ली, भिंगार) यांच्या घरी 30 एप्रिल रोजी घरफोडी चोरी झाली होती. त्या घटनेत रोख रकमेसह चोरट्यांनी मोबाईल पळविला होता.

सदर चोरीतील मोबाईल हा योगेश दुर्गेश साठे याने विजय सुनील घोरपडे याला विकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी योगेश साठे (वय 25, रा. सैनिकनगर, भिंगार) यास शिताफीने अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी विजय सुनील घोरपडे (वय 20, रा. वडारवाडी, भिंगार) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील 7 हजार रूपये किंमतीचा मोबाईल जप्त केला. योगेश साठे व विजय घोरपडे या दोघांना अधिक तपासासाठी कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील हे. कॉ. मन्सुर सय्यद, पो.ना. रवींद्र कर्डिले, रवीकिरण सोनटक्के, सचिन अडबल, ज्ञानेश्‍वर शिंदे, दीपक शिंदे, रणजित जाधव यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा