देशात आणखी चार नव्या मार्गांवर बुलेट ट्रेन

 

मुंबई- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन रखडण्याची चिन्ह असताना देशात आणखी चार नव्या मार्गांवर बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयानं दिल्ली-मुंबई, दिल्लीकोलकाता, मुंबई-चेन्नई आणि मुंबई-नागपूर मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे. देशातल्या सर्वात बिझी असलेल्या या मार्गांवर ही चाचपणी करण्यात येणार आहे. यासाठीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना केलीय. या मार्गांवरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा खर्च, जमीन यासाठी आढावा घेणं सुरु आहे. या प्रकल्पासाठी लागणार्‍या खर्चाचा विचार करता यासाठी काही कालावधी जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद प्रकल्प 2023 च्या सुमाराला कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.