महिलेस शिवीगाळ व दमदाटी; गुन्हा दाखल

अहमदनगर – नगर- पाथर्डी रोडवरील आलमगीर, विजयनगर येथील महिलेच्या घरात घुसून आश्रम शाळेच्या कामावरून काढल्याच्या रागातून शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना मंगळवारी (दि.14) दुपारी 4.15 च्या सुमारास घडली.

या प्रकरणी कॅम्प पोलीसांनी अनिता सुभाष साळवे (वय 46) यांच्या फिर्यादीवरून विजय भिमराव गाडेकर (रा. सैनिकनगर, भिंगार) यांच्या विरूध्द भादंविक 452, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पो. ना. बी.पी. गायकवाड हे करीत आहेत.