जिल्ह्यात नव पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे ब्राह्मण महासंघाचे काम अधिक प्रभावी होईल – राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गोविंद कुलकर्णी

अ.भा.ब्राह्मण महासंघाच्या नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती

अहमदनगर- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ब्राह्मणत्व पाळणे, सामाजिक समरता सांभाळणे, शैक्षणिक कार्य, उद्योग व्यवसाय वाढविणे या आघाड्यांवर काम करत आहे. एकेकाळी नोकरी करणारा ब्राह्मण समाज उद्योग व्यवसायाकडे वळाला आहे. आरक्षणामुळे सरकारी व खाजगी नोकरीपासून लांब गेलेल्या ब्राह्मण समाजाचे युवक आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकारी व्हावेत यासाठी शैक्षणिक धोरण अवलंबून महासंघाने देशात विविध ठिकाणी युपीएससी, डॉक्टर, एमबीए, सीए असे उच्च शिक्षण ब्राह्मण युवकांना घेता यावे, यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. त्याचबरोबर उद्योजक आघाडी, व्यापारी वर्गाची ब्रह्मोद्योग आघाडी व उद्योग विकास आघाडी सुरू करून महासंघाने राज्यातील प्रतिथयश उद्योजक व व्यवसायीकांना एकत्र आणून युवकांना उद्योजक बनविण्यासाठी मार्गदर्शन व प्रत्यक्ष मदत केली आहे.

ब्राह्मण समाजाची पुढील पिढी सक्षम होण्यासाठी ब्राह्मण महासंघ प्राधान्याने काम करत आहे. विविध राजकीय पक्षातही ब्राह्मण समाजाने सक्रिय होत; ब्राह्मण समाजाचे नगरसेवक, आमदार, खासदार व्हावेत म्हणून महासंघ प्रयत्न करत आहे. या सर्व यशासाठी सर्व ब्राह्मण समाजाचे संघटन अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येक जिल्ह्यातून पाच हजार ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी व 25 लाख सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट महासंघाचे आहे. नगर जिल्ह्यात महासंघाचे काम चांगले सुरू असून, नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे हे काम अधिक प्रभावीपणे पुढे जाईल व महासंघाचे सर्व उद्दिष्ट प्रत्येक्षात येतील, असे प्रतिपादन ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक सरनाईक, जिल्हा कार्याध्यक्षपदी सुहास मुळे, शहराध्यक्षपदी संकेत होशिंग, जिल्हा युवा अध्यक्षपदी सुनिल महाजन यांची निवड झाली आहे. या सर्व नूतन पदाधिकार्‍यांनी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गोविंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यास प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की, प्रदेश महासचिव प्रा.मधुसूदन मुळे आदिंसह ब्राह्मण महासंघाचे सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मोहिनी पत्की म्हणाल्या, ब्राह्मण महासंघाच्यावतीने राज्यात समाजाच्या समस्या समजून घेऊन सोडविण्यासाठी संघटना आपल्या दारी हे विशेष अभियान राबविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून समाजाचे गार्‍हाणे त्यांच्यापुढे मांडले. परशुराम आर्थिक विकास महामंडळ सुरू करण्यास त्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.

नूतन कार्याध्यक्ष सुहास मुळे म्हणाले, कार्याध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वेगळ्या कार्यशैलीने कार्यध्यक्ष म्हणून काम करणार आहे. सर्व जाती-धर्मांना बरोबर घेत चौकटी बाहेर जावून काम करणार. पुढच्या पिढीला बर्‍याच समस्यांना तोंड द्यावयाचे आहे, तेव्हा या नव्या पिढीसाठी काम करणे गरजेचे आहे. कार्याध्यक्ष म्हणून केलेले काम हे निश्‍चितच समाजाच्या सर्वांगिण हितासाठी असेल, महासंघाची मान देशात उंचवले, असेच काम सर्वांना बरोबर घेत करणार आहे.

प्रा.मधुसूदन मुळे यांनी भाषणातून राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हाध्यक्ष अशोक सरनाईक यांनी वर्षभरात केलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

जिल्हा महासचिव सुनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. आभार शोभा ढेपे यांनी मानले. यावेळी शहर उपाध्यक्ष बाळासाहेब अनासपुरे, सुमित्रा ठिपसे, सुनिता खिस्ती, रघुनाथ सातपुते, सुदर्शन कुलकर्णी, प्रसन्न खाजगीवाले, कन्हैय्या व्यास, शिरीष दानवे, राजकुमार जोशी, डॉ.किरण माचवे, दिपक तागडे, कृष्णा जोशी, उत्कर्ष अंचावले आदि पदाधिकार्‍यांसह हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, माजी सचिव सुनिल रामदासी, बहुभाषिक ब्राह्मण न्यासचे अध्यक्ष एन. डी. कुलकर्णी, माजी उपमहापौर गीतांजली काळे, बहुजन शिक्षण आघाडीचे विलास साठे, कैलास दळवी, जालिंदर तनपुरे, धनेश बोगावत आदि यावेळी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा