भाजपच्या माजी खासदारासह 7 जणांना जन्मठेप

अहमदाबाद – माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचा माजी खासदार दीनू बोघा सोलंकी याच्यासह सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय दीनू सोलंकी आणि त्याचा भाचा शिवा सोलंकी या दोघांना प्रत्येकी 15 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अहमदाबादच्या सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला. यापूर्वी शनिवारी कोर्टाने सोलंकी यांच्यासहीत सातही आरोपींना हत्या आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

20 जुलै 2010 रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या समोरच अमित जेठवा यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सोलंकीला क्लिन चीट दिली होती. त्यामुळे जेठवा यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. सीबीआय चौकशीत सोलंकीसहीत सातही आरोपी दोषी आढळले होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा