प्रदेशाध्यक्षांच्या घोषणेनुसार नगर शहराच्या विकासासाठी 300 कोटी द्या

भाजपाच्या नगरसेविकेने मुख्यमंत्र्यांना पाठविले स्पीड पोस्टाने स्मरणपत्र

अहमदनगर – महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी भाजपाचा महापौर झाल्यास नगर शहराच्या विकासासाठी 300 कोटीचा निधी देण्याची घोषणा केली होती. भाजपाचा महापौर होवून 7 महिने झाले तरी अद्याप हा निधी मिळाला नसल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे तातडीने हा निधी देण्यात यावा, असे स्मरणपत्र भाजपाच्या नगरसेविका सोनाबाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पीड पोस्टाने पाठविले आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारच्या पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक येथील प्रचारच्या शुभारंभ कार्यक्रमात भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी शहरात मूलभुत सुविधांचा अभाव आहे. एकेकाळी शांत असलेले शहर अशांत झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेत भाजपाला एकहाती सत्ता द्या. नव्या महापौरांचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना नगर शहरात आणू, असे सांगत त्याच दिवशी नगरच्या विकासाकरिता 300 कोटी रुपये निधी देऊ, अशी घोषणा केली होती. तसेच आपणसुध्दा नगर शहराच्या विकासासाठी मोठा निधी देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु अध्यापपावेतो नगर शहराच्या विकासकामासाठी रु.300 कोटीचा निधी मिळाला नसल्याने महानगरपालिका ही सध्या आर्थिक संकटात सापडलेली आहे. नगर महापालिका ही ‘ड’ वर्ग महापालिका असल्याने याठिकाणी उत्पन्नाचे स्त्रोत कमी आहेत. शहराचे व पाणी योजनचे लाईट बील व ठेकेदाराचे देणे, कर्मचार्‍यांचे पगार, पेन्शनर्सचे पेन्शन व शहर विकासाठी कुठल्याही प्रकारे निधी नसल्याने शहरात विकास कामेही ठप्प झालेली आहे.

…तर आमदारसुद्धा भाजपाचा होईल

याआधीच्या कालावधीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षाचे महापौर होवून गेलेले आहेत. त्यांना त्यांच्या काळात कुठल्याही प्रकारे विकासनिधी आणता आलेला नाही. त्यामुळे शहर विकासाठी महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन समाजवादी पार्टी व अपक्ष नगरसेवक यांनी नगर शहराला विकासाठी मोठा निधी मिळणार असल्याने त्यांनीसुध्दा भाजपाचा महापौर करण्यास पाठिंबा दिलेला आहे. तरी नगर शहराच्या विकासासाठी लवकरात लवकर 300 कोटीचा निधी हा कुठल्याही प्रकाराचा महापालिकेकडून हिस्सा न घेता 100% निधी देण्याची व्यवस्था केल्यास शहराचा विकास होण्यास मदत होईल व येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्येसुध्दा नगरमध्ये भाजपाचा आमदार नगर शहरातील जनता निवडून देईल, असा विश्‍वास मला आहे. त्यामुळे नगर शहराच्या विकासासाठी 300 कोटीचा निधी हा तातडीने मिळावा, अशी मागणी नगरसेविका सौ.सोनाबाई तायगा शिंदे यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा