दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण

नगर – दारू पिण्यासाठी पैसे का दिले नाही? अशी विचारणा करून पाच जणांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅकजवळ रविवार (दि.1) रात्री 11.30 च्या सुमारास घडली. अभिजित संजय जाधव (वय 25, रा. बोल्हेगाव गावठाण, राम मंदिरासमोर) हा घरी जात असताना जॉगिंग ट्रॅकजवळ पक्या भाकरे, प्रमोद भाकरे, विकी भाकरे, शुभम भाकरे (सर्व रा. नागापुर) आणि साहिल शेख (रा. पोलिस कॉलनी, बोल्हेगाव) यांनी त्यास अडवुन आम्हास दारू पिण्यास पैसे का दिले नाही? अशी विचारणा करून शुभम भाकरे याने अभिजित जाधव याच्या कमरेवर लाकडी दांडक्याने व डोक्यावर मारून जखमी केले. त्यावेळी इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण करीत शुभम यास दमदाटी केली. या प्रकरणी अभिजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीसांनी भारतीय दंड विधान कलम 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस नाईक चौधरी हे करीत आहेत.