भिंगार कॅन्टोन्मेंटची निवडणुक ‘आम आदमी पार्टी’ लढविणार

अहमदनगर- भिंगार येथील कॅन्टोन्मेट बोर्डाची आगामी निवडणुक आम आदमी पार्टीच्यावतीने झाडू चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निवडणुकीकरीता पक्षाच्यावतीने रवि सातपुते, खाकाळ, संदिप कनोजिया, दिलीप घुले यांची समिती नेमण्यात आली आहे.

आम आदमी पार्टी पक्षाची बैठक नुकतीच पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक अॅड. जावेद काझी यांच्या उपस्थितीत झाली. त्यामध्ये या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली.

या सभेमध्ये कॅन्टोन्मेंट भागात पक्षाने मतदारांशी संपर्क करावा. नवीन तरुण कार्यकर्त्यांची फळी उभारावी. तसेच संपुर्ण कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समस्या समजून घेऊन दिल्ली पॅटर्न प्रमाणे कॅन्टोन्मेंंट बोर्डात बदल घडवून आणणे करीता पक्षाची भूमिका राबवावी, असे सर्वानुमते ठरले.

तसेच नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड 19 जानेवारी रोजी घेण्याचे ठरले आहे. तेव्हा जिल्ह्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मिटींगला उपस्थित रहावे. कार्यकर्त्यांनी संपर्कासाठी मोबा. डॉ. श्रीगोपाल राजपूत 735018000, संदिप कनोजिया, 8983987018, रवि सातपुते 9371140912, दिलीप घुले 9423422831, संपत मोरे 9730640641 जारी करण्यात आले आहे.