भाऊसाहेब कबाडी यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार

अहमदनगर- अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगांव येथील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांना भारतीय पत्रकार संघाच्यावतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय पत्रकार संघाच्यावतीने नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास अ.नगर मनपा शिक्षण विभागाचे प्रशसनाधिकारी सुभाष पवार, अ.नगर मनपा माजी उपायुक्त रामकिसन देशमुख, पित्रोडा सेल्सचे परेश पित्रोडा, सुवर्णराज ट्रेडर्सचे राजेंद्र कटारिया, सहशिक्षक शिवराज वाघमारे यांच्या उपस्थितीत भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे, सिने अभिनेत्री रुपाली पवार, प्राचार्य डॉ.राम कुलकर्णी, डॉ. हर्षद पिळोदकर, अॅड.मनिषा चिंधडे उपस्थित होते.

भाऊसाहेब कबाडी यांनी ओंकारनगर शाळेत विविध उपक्रम राबवत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या वाढवली. तसेच ओंकारनगर शाळेला आयएसओ मानांकन मिळवून दिले. भाऊसाहेब कबाडी यांना आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबरच ओंकारनगर शाळेलाही विविध पुरस्कार मिळाले आहेत.