भातोडीच्या उपसरपंचपदी राजू पटेल यांची बिनविरोध निवड

अहमदनगर – नगर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या भातोडी गावच्या  उपसरपंचपदी राजू पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. पटेल हे शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

गावचे तत्कालीन उपसरपंच भरत लबडे यांनी ३० डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तो १ जानेवारी रोजी सभेमध्ये बहुमताने मंजूर करण्यात आला. गावच्या सरपंच सौ. संगीताताई बाबासाहेब नेटके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१३) उपसरपंच निवडणूक पार पडली. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यावेळेत राजूभाई पटेल यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्ज छाननीत तो वैध झाला. २ वाजता प्रत्यक्ष निवडणूक झाली. परंतु पटेल यांचा एकमेव अर्ज असल्याने सरपंच सौ. संगीताताई नेटके यांच्या अध्यक्षतेखाली पटेल यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

दरम्यान पटेल यांच्या अर्जावर  सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली. दोन वाजता सरपंच संगीता ताई नेटके यांनी राजू पटेल यांची निवड घोषित केली. त्यांच्या निवडीबद्दल सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सत्कार केला. पटेल यांची निवड झाल्याबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष साईनाथ लबडे, मेजर रियाज भाई शेख,घनश्याम लबडे, बाबासाहेब नेटके, पोपट पटेल, शालेय समिती चे अशोक तरटे, गणेश गायकवाड, ज्ञानेश्वर घोलप, घनश्याम राऊत, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, जिल्हा उपप्रमुख तथा जि. प.सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे, सरपंच सौ.संगीताताई नेटके, शिवसेना उपतालुका प्रमुख निसार भाई शेख, राष्ट्रवादी चे पापमिया पटेल, अमोल कदम, आदिनाथ शिंदे, भाऊसाहेब धलपे यांनी अभिनंदन केले.