भारिप बहुजन महासंघाचा 10 ऑगस्टला युवक मेळावा

अहमदनगर- भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांचे संयुक्त विद्यमाने 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. माऊली सांस्कृतिक भवन येथे युवकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास सुजात आंबेडकर युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अमित भुईगळ, प्रदेश युवक महासचिव, पक्षप्रवक्त्या दिशा शेख व प्रदेश सचिव सचिन माळी उपस्थित राहणार आहेत. नगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी डॉ. अशोक सोनवणे, जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ, डॉ. परवेज अशरफी, जिल्हाध्यक्ष एमआयएम व डॉ. अरुण जाधव, सुनिल शिंदे, दिलीप साळवे आदी उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील युवकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा युवाध्यक्ष सागर भिंगारदिवे व जिल्हा युवा महासचिव विनोद गायकवाड यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा